जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ गठित

देवरी: जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे विद्यार्थी शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक कापसे यांनी मांडले विद्यार्थ्यांमध्ये मंत्रिमंडळ निर्माण करून त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या सूप्त गुणाचा विकास घडवण्यासाठी त्यांच्या खांद्यावर भार दिल्यानंतर ती सर्व मुले शाळेच्या कार्यभार उत्साहाने पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली .शालेय स्वच्छता ,क्रीडा, आरोग्य स्वच्छता, पोषण आहार, पर्यावरण इत्यादी बाबी त्यांच्यावर सोपवल्यामुळे खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली .शाळा नायक- युुग तेजराम नंदेश्वर व निशा नंदेश्वर नेताम,सांस्कृतिक प्रमुख- गगन दिनेश शहारे व आस्था संजय डोये,क्रीडा प्रमुख- नंदिनी बावणे व भूषण रमेश चौधरी, आरोग्य प्रमुख- सार्थक शिवकुमार राऊत व अवनी मुकेश भाजीपाले, स्नेहसंमेलन प्रमुख- यश प्रभू मनगटे व आयुषी कुंभरे, वाहन प्रमुख-सुधांशू आशिष पांडे व हंसिका शेंडे,स्वच्छता प्रमुख- कृती डोंगरे व अथर्व ऊईके, पोषण आहार प्रमुख – रुचिरा मुनेश्वर व दिशांत बावनकर पर्यावरण प्रमुख- आषांक रामटेके व कोमल इडपाते आदी वरील प्रमाणे विद्यार्थी प्रमुखाच्या नियुक्ती करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून चॉकलेटची वाटप न करता त्यांना शाळेसाठी एक झाड दान करण्याचे आवाहन करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात अतिशय आनंदाने सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

Print Friendly, PDF & Email
Share