जि.प.व प्राथ.शाळा -मुल्ला शाळेला एक लक्ष पाच हजार रक्कमेचे ब्लेझर चे वाटप

■ देवरी तालुक्यातील मुल्ला शाळेचा अभिनव उपक्रम

देवरी: जि.प.व प्रा.शा.मुल्ला येथील १२० विद्यार्थांना एक लक्ष पाच हजार रुपयांचे ब्लेझर शुक्रवार (ता.०५ जुलै ) रोजी दान करण्यात आलेले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात एक कार्यरत शिक्षिका कु.सुशिला हरिचंद भेलावे (स.शि) मुल्ला यांनी आईवडिलांचे नावे एक लक्ष पाच हजार रुपयांचे ब्लेझर दान केले.यामुळे भेलावे कुटुंबातील संबंधित शिक्षिका व, त्यांची मुले कुमार.ओश्वीन,कुमार.वेदांत आई-सुंदरबाई भेलावे, वडिल-हरिचंद भेलावे, भाऊ-गणेशजी भेलावे यांचा शाळेतर्फे गटशिक्षणाधिकारी एम.एस.मोटघरे तथा सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील तथा या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.डि.के गभने मॅडम,सौ.पी.एन.कुंभलकर मॅडम,कु.एस.डब्लू उके मॅडम तथा केंद्राचे केंद्रप्रमुख के.बी.गभने यांनी भेलावे कुटुंबियांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केलेले आहेत.
यावेळी देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम.एस.मोटघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांनी म्हंटले कि,अशा होतकरू व एवढ्या महाग वस्तू शाळेतील विद्यार्थांना देणे ही प्रेरणा यांना ज्यांनी दिले त्यांचे तर आभारच मानावे लागेल तथा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात जिथे लोक पैशाचा विचार करतात तिथे यांनी आपले उदार मन दाखवत एवढ्या मोठ्या स्वरूपाची वस्तूरूप देणारी देणे म्हणजे गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत देवरी तालुक्यातुन ते खरोखरच आदर्श शिक्षिका होण्याचे खरे मानकरी ठरतात कारण यांनी गोर गरिबांच्या लेकरांना ब्लेझर दान केलेले आहे.
लोक मंदिरात लाखो रुपयांचे दान करतांनी बघितले परंतु शाळेत आजच्या आधुनिक युगात एवढ्या रकमेचे ब्लेझर दान करणारी ही पहिली शिक्षिका तथा पहिलीच शाळा ठरली यांचे कडून इतर शिक्षकांनी प्रेरणा घेऊन शाळेच्या विकासात अशाच प्रकारचे आदर्श दाखवावे असे जाहिर आव्हान केलेले आहे.
या प्रसंगी ग्राम मुल्ला येथील ग्रामवासियांनी कु.सुशिला हरिचंद भेलावे व त्यांच्या कुटुंबियांचे जाहिर अभिनंदन केलेले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share