गोंदिया जिल्हातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या
गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केलेल्या ६२६ शिक्षकांच्या बदल्यांत शिक्षक बोट ठेवतील त्याच ठिकाणी त्यांना बदली देण्यात आली. यंदाच्या बदल्यांमुळे ९० टक्के शिक्षक आनंदित, तर १० टक्के शिक्षक नाराजीत दिसले.बदली प्रक्रिया राबविताना दरवर्षी अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येते.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५ व ६ जुलै रोजी बदली प्रक्रिया राबविली. यात ६२६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांत बदलीची अट असताना तिरोडा तालुक्यातील दोन शिक्षकांनी एकच वर्ष काम केले असतानाही त्यांची बदली अर्जुनी-मोरगाव तालुक्यात करण्यात आली आहे.