सालेकसा येथे उमेदचे कार्यालय सुरू करा: संजय पुराम

सालेकसा◼️गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व तिरोडा तालुक्यात उमेदची कार्यालये नसल्याने सर्व कामे माविमतर्फे केली जातात. त्यामुळे मविम येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाचा खूपच तान पडत असल्याने अन्य तालुक्याप्रमाणेच सालेकसा व तिरोडा तालुक्यात ही उमेदची कार्यालये सुरू करा अशी मागणी माजी आमदार संजय पुराम यांनी नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्याशी भेट घेऊन मागणी केली. तसेच या मागणीचे निवेदनही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना दिले.प्रसंगी येत्या काही दिवसातच सालेकसा व तिरोडा येथे उमेदचे कार्यालये उघडण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहे.

Share