शशीकरण देवस्थानसाठी सर्व्हिस रोड त्वरित बनवा: महेश डुंभरे युवा प्रमुख (उबाठा)

◼️अग्रवाल कंपनी चे चार तास काम ठेवला बंद, सात दिवसाचा अल्टिमेटम

सडक अर्जुनी: हजारो वर्ष पुरातन शसीकारण देवस्थानं हे गोंदिया जील्हातील जागृत मंदिर आहे महामार्गा क्रं 06 वर जंगलाच्या सानिध्यात हे मंदिर आहे ह्या मंदिरात दर सोमवार बुधवार ला हजारों च्या संख्येत भाविक दर्शना साठी येतात
मंदिरातील दूर दुर वरुन भाबिक भक्त येतात ह्या मंदिरा नवरात्रला एक दिवसाची भव्य यात्रेचा आयोजान समिति कडून करण्यात येते
मंदिरासमोर परिसरात वन्यजीव येण्याजाण्यासाठी कोट्या रूपये खर्च करुन शासन तर्फे उडान पुलाचे काम सूरु आहे पर्याय मंदिरात भाविकांना येण्या जाण्यासाठी शासनाने मंजूर केलेला रोड न बंनवल्यामुडे व मंदिरात येण्या जाण्याचां मार्गावर नाल्या खोदून ठेवल्यामूळे त्रस्त झालेले भावीक भक्त आज दि 8 जुलै ला मंदिरात पुजा करायला जाण्यासाठी रोड रस्ता खोदून ठेवल्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनी चे काम बंद करुन नारेबाजी कऱण्यात आली.

शशीकारण मंदिर विराजित योगिराज धूनीवाले बाबा सेवा समितीचे प्रमूख तुकाराम कुरसुंगे काम बंद आंदोलनात मंदिरातील महाराज सुखदेव महाराज हे स्वतःच महामार्गावर ठाम मांडून बसले होते. राकेश ठाकुर, गुड्डू पांडे, मंगेश तवाडे , रितेश, प्रफुल वैधे असे 100 ते 200 भाविक भक्त अग्रवाल कंपनीमूळे त्रस्त होउन काम बंद आंदोलन करण्यात आले.

Share