देवरी ◼️भरधाव ट्रक ने महामार्ग पोलीस गाडीला उडवले , 3 पोलीस कर्मचारी गंभीर

देवरी ◼️राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील मासुलकसा घाट येथे एका ट्रकने महामार्ग पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी तर अन्य दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मनीष बहेलिया असे गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ट्रकची धडक इतकी भीषण होती की पोलीस गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मनीष बहेलिया असे गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ट्रकची धडक इतकी भीषण होती की पोलीस गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share