त्या.. अपघातातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

◼️मनीष बहेलिया असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे

देवरी ◼️राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील मासुलकसा घाट येथे CG 08 AK 1402 क्रमांकाच्या ट्रकने महामार्ग पोलिसांच्या गाडीला MH 12 RT 9625 धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी मृत तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. मनीष बहेलिया असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ट्रकची धडक इतकी भिषण होती की पोलीस गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. देवरी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share