जिप हायस्कूल देवरी चे दीपक कापसे नवे प्रभारी मुख्याध्यापक

देवरी ◼️जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे मंगलमूर्ती सयाम यांची बदली सडक अर्जुनी तालुक्यामध्ये झाल्याने त्यांचे पद रिक्त असल्यामुळे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी दीपक कापसे यांना प्रभारी मुख्याध्यापक कारभार हस्तांतरित करण्याचे आदेशित केले. प्रभार स्वीकारल्यानंतर राजेश भाऊ चांदेवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , धनवंत कावळे गटसमन्वयक, केशव चोपकर उपमुख्याध्यापक , डीलेस टेटे, लांजेवार, दांडेकर, पील्लारे, सावरकर, फुन्ने , ठवरे , गावळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
श्री सयाम यांनी बंद पडलेल्या शाळेला पुनर्जीवित झाली व साडेतीनशेच्या वर पटसंख्या टिकवून ठेवली व गुणवत्ता विकास घडवून आणला त्यांचे स्वप्न साकार करण्याचे काम माझ्या हातून घडावे असे मत दिपक कापसे यांनी व्यक्त केले.
Share