सुरगाव येथिल मामा तलावाचा मत्स्यपालन लिलाव गावकऱ्यांना द्या

गावकऱ्यांचा पंचायत समिती अर्जुनी मोरगाव ला आंदोलन

अर्जुनी मोर ◼️तालुक्यातील सुरगाव चांपटी येथिल 100 वर्ष पुरातन मामा तलाव हा ग्राम सुरगावचा आहे ह्या तलावावर प्रौढ संस्था तयार करुन गावकऱ्यांची दिशा भूल करुन संघ मैत्री मत्स्यपालन सह. संस्था ला लिलाव न देण्याबाबत दि 28 जून ला 400 गावकरी मोरगाव अर्जुनी येथिल पंचायत समिती वर धडक मोर्चा नेवून लिलाव रद्द करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार गट ग्रामपंचायत सावरटोला अधिकार क्षेत्रात असून त्या तलावावर गावातील लोकांना रोजगार मिळेल त्यामुळे सदर तलाव गावातील बचत, गटग्रामपंचायत ला देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Share