शैक्षणिक प्रवाहात पालकांची महत्त्वाची भूमिका – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

◾️ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे पालक सभा आणि चर्चासत्र संपन्

देवरी ०६: उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्या असून शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. पूर्वप्राथमिक शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची शाळेत गर्दी झालेली दिसत आहे.नुकतेच शाळेची घंटा वाजली असून विद्यार्थी उत्साहाने शाळेत येत आहेत. नवीन सत्राची शैक्षणिक माहिती , परीक्षा पध्दती, मुलांचे आहार या विषयावर पालकांना जागरुकता असावी या उद्देशाने ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते.

सदर पालक सभेत पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक आणि वागणुकी संबंधित समस्या शिक्षकांसमोर मांडल्या आणि शिक्षकांनी पालकांच्या सहकार्याने उणीवा कशा भरून काढाव्या या विषयावर चर्चा करण्यात आली.या चर्चा सत्रात प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी पालकांचे समुपदेशन करत पूर्वप्राथमिक वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करीत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे व्यक्त केले.

चर्चासत्रात नर्सरी ते केजीच्या वर्गाच्या पालकांनी सहभाग दर्शविला असून शिक्षिका मनीषा काशीवार, कलावती ठाकरे प्रियांका सलामे या शिक्षकांनी सहकार्य केला.

Share