माविम यंत्रणे ऐवजी उमेद चे कार्यालय सुरु- सविता पुराम

जिल्हाधिकारी यांना निवेदन

गोंदिया ◼️जिल्हयातील सालेकसा आणि तिरोडा तालुका अंतर्गत माविम यंत्रणे ऐवजी उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान) प्रमाणे कार्यालय सुरु करण्यासाठी जिल्हाचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत कार्यान्वित यंत्रणा महिला अर्थिक विकास महामंडळ-मविम हे गोंदिया जिल्हयातील दोन तालुके सालेकसा व तिरोडा येथे कार्यान्वत आहेत व गोंदिया जिल्हयातील उर्वरित ६ तालुक्यांन मध्ये उमेद कार्यान्वित आहे. माविम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आर्थिक विकास महामंडळ प्रभागसंघ व ग्रामसंघ लेखापाल, समुदाय साधन व्यक्ती (CRP) यांचे कडुन काम भरपुर करवून घेतले जातात ते त्यांचे काम योग्य पध्दतीने करतात काम भरपुर असुन मानधन अत्यंत कमी मिळतो. त्यांना ते परवडण्यासारखे नाही दुसरीकडे उमेद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन जास्त मिळतो.

त्यामुळे तिरोडा व सालेकसा येथील माविन ही कार्यान्वित यंत्रणा बंद करुन त्या एवज उमेद ही यंत्रणा सुरु करावी व माविम येथील कर्मचारी उमेद या यंत्रणेत समाविष्ट करावे. अशी मागणी सविता पुराम यांनी केली आहे.

Share