विद्यार्थ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही, विद्यार्थ्यांसाठी बस थांबवा – सविता पुराम

◼️सविता पुराम यांचे आगार व्यवस्थापक गोंदिया यांना विनंती वजा आदेश

देवरी ◼️ जिल्हा अंतर्गत आमगांव व देवरी तालुक्यातील अनेक गावावरुन शिक्षण घेण्यासाठी विदयार्थी बस ने ये जा करतात . तालुक्यातील ग्रामीण भागातून देवरी येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस चालक बस थांबवित नसल्याने ग्रामीण भागातील पालकांची चिंता वाढली आहे. सावली, लोहारा मुल्ला बस थांब्यावरून गोंदिया- आमगांव देवरी या मार्गावरुन चालणाऱ्या बसेस लोहारा व इतर स्थानकांनवर न थांबल्यामुळे विदयाथींना शाळेत ये-जा करण्यास त्रास होत आहे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर बस थांबवून विदयार्थाना घेण्यात यावे जेणे करुन ते शाळच्या नियोजित वेळेत पोहचतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि केलेल्या कार्यवाही चा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे विनंती वजा आदेश सविता पुराम सभापती महिला व बालविकास जिप गोंदिया यांनी दिले आहे.

Share