देवरी तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा संपन्न

◼️गशिअ महेंद्र मोटघरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा

देवरी ◼️ पंचायत समिती देवरी अंतर्गत तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकाची सभा छत्रपती शिवाजी हायस्कूल देवरी येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी प.स.देवरी य व मा.वाघमारे शि.वि.अ., राऊत शि.वि.अ., मा.धनवंत कावळे गट समन्वयक गसाके देवरी व मनोज भुरे प्राचार्य छत्रपती शिवाजी विद्यालय देवरी, वाढीवा व्यवस्थापक बस स्टॉप देवरी तसेच सर्व विषय तज्ञ, विशेष शिक्षक उपस्थितीत होते.

सदर सभेत शैक्षणिक गुणवत्ता , शालेय उपक्रम, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक सहशालेय उपक्रम, बस सुविधा, मुलीचे बस पासेस या बरोबर वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी लाभाच्या योजनांचे नियोजन कसे प्रभावीपणे राबवता येईल या विषयी विविध उदाहरणे देऊन गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
सभेचे संचालन विजय लोथे विषय तज्ञ यांनी व आभार प्रदर्शन धनवंत कावळे गट समन्वयक यांनी केले.

Share