श्रीमती के एस जैन विद्यालयात नव प्रवेशितांचे स्वागत आणि पुस्तकांचे वाटप


देवरी – श्रीमती के. एस. जैन विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रजिया बेग यांचे अध्यक्षतेखाली विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एन. ए. पटले, पी.एच. परिहार आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विद्या येवले यांचे प्रमुख उपस्थितीत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे प्राचार्य आणि शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी आपला अल्प परिचय दिला आणि थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळेत उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रजिया बेग यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दुर्गा काळे यांनी तर सविता गिरी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका जी. के. जांभुळकर यांनी सहकार्य केले.

Share