तिरोडा येथे रुग्णालयाच्या टाकीत पडून कर्मचार्‍याचा मृत्यू

तिरोडा◼️भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून रुग्णालयात कार्यरत कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना शुक‘वार 28 जून रोजी उघडकीस आली. नीलकंठ परसराम तरोणे (57) रा. गिरोला, ता. सालेकसा असे मृताचे नाव आहे. तरोणे तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात वॉर्डबाय म्हणून कार्यरत होते.

माहितीनुसार नीलकंठ तरोणे हे गुरुवार, 27 जून रोजी रात्री कर्तवयावर होते. रात्री 11 ते 12 च्या सुमारास पाण्याची टाकी भरल्यामुळे पाण्याचचे विद्युत मोटारपंप बंद करण्याकरिता गेले असता, ते पाण्याच्या टाकीत पडले. शुक‘वारी सकाळी ते रुग्णालयात कुठेही दिसून न आल्याने कर्मचार्‍यांनी त्यांचा शोध घेतला असता रुग्णालयातील पाण्याच्या टाकीत त्यांची चप्पल तरंगताना दिसून आली. पाय घसरून ते टाकीत पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने तिरोडा पोलिसांना दिली. सहायक फौजदार मनोहर अंबुले व शिपाई शैलेश दमाहे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आला. फिर्यादी दिलीप नीलकंठ तरोणे (31) रा. गिरोला यांच्या तक्रारीवरुण तिरोडा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

Share