लोहारा येथील महाविद्यालयाच्या लिपीकाने केला लाखोंचा अपहार, देवरी पोलिसांत गुन्हा दाखल

देवरी ◼️ तालुक्यातील सुरतोली/लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या लिपीकाने शिक्षण संस्थेची फसवणूक करुन 9 लाख 22 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धोबीसराड येथील राजकुमार मडामे यांनी जनता बहुउद्देशीय संस्थेतंर्गत 2012 मध्ये सुरतोली/लोहारा येथे महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच आरोपी तथागत प्रल्हाद गजभिये याची महाविद्यालयात लिपीक पदावर नियुक्ती करुन त्याच्यावर महाविद्यालयाची पूर्ण जबाबदारी विश्‍वासाने सोपविली. दरम्यान आरोपीने 27 जून 2017 रोजी महाविद्यालयात पूर्णवेळ 6 प्राध्यापकांची नियुक्ती केली. राजकुमार मडामे यांनी आरोपीने केलेल्या प्राध्यापक पदाच्या निवड प्रस्तावाची चौकशी केली असता आरोपीचे राष्ट्रीय पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 1 ऑक्टोबर 2022 रोजी आरोपीला कारणे दाखवा नोटीस दिल्यावर आरोपीने 21 डिसेंबर 2022 रोजी पोस्टाद्वारे राजीनामा पाठविला. संस्थेने 28 ऑक्टोर रोजी राजीनामा मंजूर करुन आरोपीला सेवामुक्त करुन त्याच्याकडे असलेले महाविद्यालयाचे दस्तावेज, साहित्य, चेकबुक आदी कागतपत्र जमा करुन प्राचार्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्यास कळविले होते. मात्र आरोपीने आपल्या सेवाकाळात महाविद्यालयाच्या बँक खाताच्या दोन धनादेशाद्वारे 9 लाख 22 हजार 500 रुपये आपल्या बँक खात्यात वळते करुन अपहार करुन संस्थेची फसवणूक केल्याचे समोर आले.

आरोपी हा महाविद्यालयात सन २०१२ ते दि.२१/१०/२०२२ पर्यंत क्लर्क (लिपीक) व सहा. प्राध्यापक पदावर कार्यरत असतांना महाविद्याल यातील एस.बी.आय. शाखा देवरी खाता क. ३२५३७७१४०६५ चे बँकेने निर्गमित केलेले सन २०१९ (चेक क.२३०३२६ ते २३०४२५) मधील चेक क. २३०३५६ व २३०३५७ स्वताः कडे बाळगुन आरोपीने दि.०७/०६/२०२४ रोजी दोन्ही धनादेश क. २३०३५६ रक्कम ५,००,०००/- रू व २३०३५७ रक्कम ९,२२,५००/- रू वर फिर्यादीची बनावट स्वाक्षरी व लिखान करून एस.बी.आय. शाखा देवरी येथील आपले खाते क. ३३९४८७९९६९१ वर वळते करण्यासाठी दोन्ही धनादेश बँकेत लावुन आपले आर्थीक फायद्याकरीता महाविद्यालयाचे खाते क्रमांक ३२५३७७१४०६५ मधुन ९,२२,५००/- रू चा अप्रामाणिकपणे रक्कमेचा अपहार, विश्वासघात करून महाविद्यालयाची फसवणुक केल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व चौकशी अहवाला वरून पोस्टे देवरी येथे अप.कं. २१५/२०२४ कलम ४०६,४०८,४२०,४६५,४६७,४६८,४७१ भा.द.वी. अन्वये दाखल असुन तपास सपोनि गंगाकाचुर पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

Share