जिल्हयात 24 तासांत 26.2 मिमी पावसाची नोंद

गोंदिया◼️दडी मारून बसलेल्या पावसाने अनेक भागात हजेरी लावली. काही भागात दोन दिवस सरी बरसल्या. यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात गत 24 तासांत गोंदिया तालुक्यात 25.8 मिमी, आमगाव 55.7, तिरोडा 11.3, गोरेगाव 23.2, सालेकसा 24.9, देवरी 32.2, सर्वात कमी अर्जुनी मोर 5.4 व सर्वाधिक सडक अर्जुनी तालुक्यात 40.8 मिमी असा सरासरी 26.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद केली गेली.

Print Friendly, PDF & Email
Share