महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना

गोंदिया◼️मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांसाठी लाडली बहना योजना सुरू करावी, अशी मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती.

त्यांच्या मागणीला यश आले असून आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री अजीत पवार यांनी केली.  योजने अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयाच्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे. योजनेची अमलबजावणी पुढील महिनयापासून होणार आहे. दरम्यान आ. अग्रवाल यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share