ब्लॉसम पब्लीक स्कुल देवरी येथे जागतीक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

देवरी 26 : ब्लॉसम पब्लीक स्कुल येथे जागतीक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा गोंदिया पोलीस दलाच्या च्या विशेष सहकार्याने करण्यात आला. अमली पदार्थ सेवन केल्याबद्दल काय दुष्परिणाम होतात याबाबत विद्यार्थानां देवरी पोलिस अधिकारी यांच्या तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.  सदर कार्यक्रमादरम्यान सपोनि. अंजोरी गंगाकाचुर , मपोउपनि. गीता मुळे ,पोलीस स्टॉपसह , प्राचार्य डॉ.सुजित टेटे मंचावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमा दरम्यान डिसेंबर १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये २६ जुन हा दिवस अमली पदार्थाचे सेवन व अवैद्य तस्करी विरोधी दिन दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा ठराव केला आाहे. तेव्हापासुन अमली पदार्थाच्या उपद्रवकारक समतेबाबत जनमासामध्ये जागृती निर्माण होण्याकामी तसेच त्याचा मुकाबला करण्यास सज्ज होण्याकामी जगभरात २६ जुन हा दिवस अमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन साजरा केला जातो. 

जिल्हाचे पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये नित्यानंद झा अपर पोलीस अधिक्षक गोदिया कॅम्प देवरी व विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात २६ जुन रोजी देवरी येथिल नामाकींत असलेल्या ब्लॉसम पब्लीक स्कुल येथे जागतीक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. या वेळी ब्लॉसम पब्लीक स्कूल देवरीचे शिक्षक व विद्यार्थी हजर होते.

Share