पत्रकार संघाच्या नवनिर्मित इमारतीचा उदघाटन सोहळा शुक्रवारला

◼️दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देवरी – गोंदिया जिल्ह्यात एकमेव अशी देवरी तालुका पत्रकार संघाची नवनिर्मित इमारतीचा उदघाटन सोहळा आणि सोबतच २०२३ – २४ या सत्रात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नवनिर्मित पत्रकार भवनात २८ जून शुक्रवारला दुपारी १ वाजता आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
यावेळी उदघाटक म्हणून माजी आमदार संजय पुराम तर, प्रमुख अतिथीमध्ये नगर पंचायतचे अध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, जि. प. सभापती सविता पुराम, जि. प. सदस्य संदिप भाटीया, उषा शहारे, कल्पना वालोदे, राधिका धरमगुळे आणि अन्य मान्यवर मंडळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
देवरी तालुक्यातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेले परंतू तालुक्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार आणि इतर सर्व सभासदांनी केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें