ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
देवरी 21: स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे जागतिक योग दिवसानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली असून यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात योग प्रशिक्षक वैशाली मोहुर्ले यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले.
योगासनाचे मानवी जीवनातील महत्व यावर आसनासोबत मार्गदर्शन करण्यात आले असून यानिमित्ताने विध्यार्थ्यांनी योगासनाचे आसन आणि महत्व समजून घेतले. योग दिनाच्या औचित्यावर अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील योग शिक्षिका वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , कलावती ठाकरे , नितेश लाडे , राहुल मोहरले, नामदेव अंबादे, स्वप्निल पंचभाई, विश्वप्रित निकोडे, नलू टेम्भरें , मनीषा काशिवार यांच्या सह सर्व शिक्षक व काही विद्यार्थी उपस्थित होते.