मनोहरभाई पटेल हायस्कूलचे सुयश

देवरी ◼️मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी ने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये वर्ग 10 वीचा निकाल 95.66 % लागला. यामध्ये प्राविण्य श्रेणीत 50 विद्यार्थी , प्रथम श्रेणीत 94 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत 75 विद्यार्थी तर पास श्रेणीत 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये तालुका व विद्यालयातून प्रथम रोहिल महेंद्र उंदीरवाडे यास 95.00% , द्वितीय समर्थ सुरेश मुनेश्वर 91.40 % तर तृतीय कु. खुशी जयराम पोरेटी 89.80 % गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक वासुदेवराव गजभिये , संस्थासचिव रामकुमारजी गजभिये , माजी प्राचार्य के. सी. शहारे , प्राचार्य जी. एम. मेश्राम , मुख्याध्यापक व्हि. एस. गेडाम , उपमुख्याध्यापक एस. टी. हलमारे , पर्यवेक्षक डी. एच. ढवळे सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share