दहावीच्या परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे सुयश

देवरी,दि.२१:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात आलेल्या १0 वीच्या परीक्षेत स्थानिक श्रीराम कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चीचगडच्या विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ यश संपादन केले.
वर्ग १० वी कुमारी कामनी राजकुमार नेताम ५०० पैकी ४५७गुणांसह ९२.८०% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावले. याशिवाय कुमारी जान्हवी मनोहर भेंडारकर४५६ गुणासह ९२.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर लोचन प्रमोदकुमार गभाने४४२ गुणासह ८८.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले.
विद्यालय ४४ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ६ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष मान.आल्हाद जी भांडारकर , प्राचार्य जितेन्द्र रहांगडाले ,पर्यवेक्षक मधुकर जी भैसारे श्री वीरेंद्र जी अंजनकर सर तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share