ब्लॉसम स्कूलचा आयुष घोडेस्वार १०च्या परीक्षेत देवरी तालुक्यात अव्वल

◼️देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूलचे 3 विद्यार्थी प्रावीण्य सूचीत

देवरी – येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षा -2024 ( इंग्रजी माध्यम) परीक्षेत भरारी मारली असून घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. परीक्षेत बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे 100 टक्के लागला आहे.

यामध्ये इंग्रजी माध्यमातील आयुष घोडेस्वार (472/500) 94.40 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक , नितीन भोयर याने 92.80 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक , जिया मनोज राऊत हिने 92.40 % तृतीय क्रमांक पटकावून ब्लॉसम पब्लिक स्कूल चे नाव लौकिक केले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , राजू सोरते, तेजस्विनी नंदेश्वर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share