सडक अर्जुनी येथील लाचखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
गोंदिया : बांधकामाच्या कार्यादेशासाठी कंत्राटदराकडून 1,82000 हजार रुपयाची लाच स्वीकारणार्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविकेचा पती व खाजगी इसम अशा सहा जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार 14 मे रोजी कारवाई केली होती. या सहाही आरोपींना न्यालयाने 16 पर्यंत पोलिस कोठडीत दिली होती. आज सर्व सहाही आरोपींना येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सडक अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रात वैशिष्ठपूर्ण कामा अंतर्गत नाली बांधकामाचे कंत्राट तक्रारदार यांना मिळाले होते. या बांधकामाचे कार्यादेशासाठी नगराध्यक्ष तेजराम मडावी, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद हलमारे, बांधकाम सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी, नगरसेविकाचा पती जुबेर शेख आणि खाजगी इसम शुभम येरणे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापडा कारवाई करून बुधवार 14 मे रोजी 1 लाख 82 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. सर्व आरोपींवर डुग्गीपार पोलिस स्टेशन येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून ताब्यात घेण्यात आले होते 15 रोजी सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले न्यायालयाने 16 मेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी ठोठावली होती. कोठडी संपली असल्याने सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींनी अंतरिम जमानतीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला व 30 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. सर्व आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.