गोठाणपार हत्याकांडातील आरोपींची रवानगी

देवरी तालुक्यातील गोठाणपार हत्या, अत्याचार प्रकरण

देवरी◼️ तालुक्यातील गोठाणपार येथे लग्न समारंभातून अल्पवयीन मुलीचे अपहण करून तिच्यावर आत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी 4 विधी संघर्षित बालकांना अटक करून त्यांची नागपूरच्या बालसुधार गृहात रवानगी केली होती. आरोपी म्हणून बालन्याय मंडळासमोर सादर केल्यानंतर बाल न्याय मंडळाच्या सदस्य अ‍ॅड. मेघना गंगणे यांनी आदेश पारित करून त्या चारही विधी संघर्ष आरोपींना निरीक्षण गृह नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. बालीग गुन्हेगारांप्रमाणे कोर्टात सुनावणीनंतर शिक्षा जाहीर केली जाईल. सध्या ते 18 वर्षांचे होईपर्यंत निरीक्षण गृहात राहतील, अशी माहिती अ‍ॅड. गंगणे यांनी दिली.

गोठाणपार येथे 19 एप्रिल रोजी एका कुटुंबात मुलीचे लग्न होते. या लग्न समारंभात पीडित मुलगी कुटुंबासह सहभागी झाली होती. दरम्यान, ती अचानक बेपत्ता झाली. दुसर्‍या दिवशी गोठाणपारपासून अडीच ते तीन किमी. अंतरावरील जंगल शिवारात त्या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असता, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी सर्व भौतिक बाबी तपासून 4 विधी संघर्षित आरोपींना अटक केली होती. त्यांची विचारपूस केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना नागपूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

Share