पोवारी साहित्य मंजूषा : लोकार्पण सोहळा २४ जानेवारीला

ॲड.प्रशांत संगीडवार यांनी केले आयोजन

डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स

देवरी २२: पोवारी ही एक प्राचीनतम लोक-बोली आहे. ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वस्तुस्थिती असलेली ही मधुरतम बोली लुप्तप्राय होण्याची वस्तुस्थिती उद्भवत होती परंतु ही लुप्त होण्याच्या मार्गावरील बोली लिपीबद्ध होऊन, बोली-भाषाविषयक अभ्यासक व संशोधकांसाठी प्रवेश द्वार उघडून देण्याची एक सामूहिक प्रक्रिया आता जोमाने सुरू झालेली आहे. आणि त्यासाठी महाराजा चक्रवर्ती राजा भोज यांच्या वंशजांनी या पोवारी बोलीच्या पुनर्मांडणीचे कार्य सुद्धा जोमाने सुरू केले आहे. या पुनर्मांडणी करण्याच्या प्रयत्नातील एक स्थानक म्हणून ॲड.लखनसिंह कटरे यांच्या पोवारी साहित्य मंजूषा या कविता, लेख, कथा, संस्मरणे असलेल्या पुस्तकाचा लोकार्पण कार्यक्रम दि.24 जानेवारी (रविवार) ला देवरी, जि.गोंदिया येथील माता धुकेश्वरी मंदिराच्या आवारात सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार अभिजीत वंजारी आणि क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील समाजसेवक व प्रख्यात अधिवक्ता प्रशांत नामदेवराव संगीडवार यांनी केले असून या कार्यक्रमासाठी देवरी-चिचगड-ककोडी परिसरातील, लखनसिंह कटरे यांच्या तत्कालीन/माजी विध्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ॲड.प्रशांत संगीडवार यांनी केले आहे.

Share