देवरी येथे सोमवारी कॉग्रेस पक्षातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवास स्थानी कार्यक्रमाचे आयोजन


देवरी, ता.२३: देवरी तालुका महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने येत्या सोमवारी(ता.२५ जानेवारी) रोजी दुपारी १२.३० वाजता. मकरसंक्रांति निमित्य महिलांसाठी सामूहिक हळदी कुंकूचा कार्यक्रम देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.


या कार्यक्रमाचे उदघाटन गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष उषाताई शहारे यांच्या हस्ते आणि जि.प.च्या माजी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. दीपप्रज्वलन जि.प.च्या सभापति लताताई दोनोडे व महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधि शिलाताई पटले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी माजी जि.प.सदस्य माधुरिताई कुंभरे, विनाताई खंडाते, महिला काँग्रेसच्या कलाबाई सरोटे, माजी पं.स.सदस्य लखनीबाई सलामे यांच्या सह देवरी तालुक्यातील महिला काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.


तरी या हळदी कुंकू कार्यक्रमात तालुक्यातील महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सहषराम कोरोटे आणि त्यांच्या धर्मपत्नी सीमाताई कोरोटे यांनी केले आहे.

Share