पत्रकारांनी माहिती प्रसारित करण्यापूर्वि सत्यता जाणून घेण्याची खातरजमा करावी – तहसिलदार विजय बोरूडे

“रेती माफिया व तहसिलदार यांच्या संगतमताने महसूल प्रशासनाची लूट शिलापूर ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन” या बातमीचे तहसिलदार विजय बोरूडे यांनी प्रेस नोट काढून केले कार्यालयीन खंडन

माहिती प्रसारित करण्यापूर्वि सत्यता जाणून घेण्याची खातरजमा करावी असे जेणे करून कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची वर्तमानपत्र संपादक , पत्रकार व न्यूज चॅनेल प्रतींनिधींना यांना दक्षता घ्यावी” अशी माहिती तहसिलदार विजय बोरूडे यांनी प्रेस नोट च्या माध्यमाने माध्यमांना दिली.

सविस्तर घडलेले वृत्त असे की शिलापूर मकरधोकडा येथील बाघनदी मधून नदीकाठावर रेती माफियांनी उपसा करून रेती सत्याचे ढीग तयार केल्याची माहिती तहसील कार्यालयात प्राप्त झाल्यामुळे दिनांक 21/01/2021 व 22/01/2021 रोजी तहसील कार्यालय देवरी येथील भरारी पथकाने सदर नदीकाठावर प्रत्येक्ष जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी रेती ढीग असल्याचे आढळल्याने त्यांना त्याबयत घेऊन जप्ती आणि मोक्का पंचनामाची कार्यवाही करण्यात आली . सर्व ढीगाचे ट्रॅक्टर द्वारे उचल करून अंदाजे 110 ब्रास रेती तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली . 1) राधेश्याम चैतराम बोहरे शेतमालक शिलापूर , 2) जवाहरलाल कन्हय्यालाल शाहू शेतमालक रा देवरी 3) नरेश रामदास धरमशहारे शेतमालक रा भागी यांच्या शेतात रेतीसाठा आढळून आल्याने त्यांना बयाना करिता बोलविण्यात येणार असल्याचे प्रेस नोट मध्ये जाहीर करण्यात आले आहे.

मौजा शिलापूर मकरधोकडा येथील संशयित रेतीमाफियाची यादी प्राप्त झाली असून त्यांना नोटिसा द्वारे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधि दिली जाईल असे तहसिलदार देवरी यांनी जाहीर केले.

संशयित ट्रॅक्टर मालकाचे नावे प्रेस नोट मध्ये नमूद केल्याप्रमाणे –

हंसराज रतिराम रहिले , चंद्रकुमार मंसाराम मानकर , विजेश मंसाराम मानकर , जागेश्वर भोयर , नरेश गोपाल भोयर , इंद्रराज कोल्हे सर्व राहणार शिलापूर , उमराव बावणकर , दिनेश बाबुराव बावनकर, सुभाष गोविंद वंजारी रा डवकी , पिंटू मूनेश्वर भागी , मनोज तूरकर मकरधोकडा , विनोद फाये भागी , मेघराज तूरकर मकरधोकडा

संबंधीतावर शासन निर्णया प्रमाणे दंडात्मक व फौजदारी कार्यवाही तसेच संबंधित ट्रॅक्टर चा वाहन परवाना रद्द करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी व उप प्रादेशिक अधिकारी यांना कळविण्यात येणार असे तहसिलदार विजय बोरूडे यांनी स्पष्ट जाहीर केले.

Share