आमदार सहषराम कोरोटे यांची ग्रेट इंडियन पुरस्कारासाठी निवड
मुंबई येथे येत्या ७ फेब्रुवारी रोजी पुरस्कार
देवरी, ता.२२; आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी कोरोना विषानुच्या संसर्गकाळात आपल्या विधानसभा क्षेत्रात लोकांच्या संपर्कात राहून त्यांना उत्तम सहकार्य केले. यांच्या या कार्याची दखल माजी आय.आर.एस.खासदार तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. उदित राज आणि बुद्धा क्रिएशन ऑफ इंडिया सिनेमा(बी.सी.आय.सी.) यांनी संयुक्त रित्या ४थ्या ग्रेट इंडियन पुरस्कारासाठी आमदार कोरोटे यांची निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी(७ फेब्रुवारी २०२१) रोजी मुंबई येथे होटल रामादा प्लाजा पाम ग्रोव जूहु बीच जूहु मुंबई मध्ये आयोजित केला आहे. या सोहळयात आमदार कोरोटे यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. उदित राज यांचा वाढदिवस ७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे न्याय दिवसच्या रुपात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन हा पुरस्कार वितरण केला जातो. या प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट सामाजिक कार्यकरणाऱ्या व्यक्तिंना ग्रेट इंडियन पुरस्काराने सम्मानित केला जातो. या मध्ये आमदार सहषराम कोरोटे यांनी कोरोना विषानुच्या संसर्गकाळात आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहून त्यांना उत्तम पणे सहकार्य केले. यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत यांची ४ थ्या ग्रेट इंडियन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे येत्या रविवारी(ता.७ फेब्रुवारी) रोजी पार पडणार आहे.
आमदार कोरोटे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व येथील लोकांनी अभिनंदन केले आहे.