तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या ६ जणांवर मधमाशांचा हल्ला

देवरी तालुक्यातील पिंडकेपार/गो. जंगल शिवारातील घटना, तेंदूपत्ता संकलन अडचणीत

देवरीः पोटाची खळगी भागविण्यासाठी तालुक्यातील पिंडकेपार / गो. येथील तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये संपूर्ण कुटुंब जखमी झाल्याची घटना ता.०३ रोजी समोर आली आहे. जखमींमध्ये अकील नागदेवे वय ५०, वर्ष अनुसया नागदेवे वय ४५, वर्ष नेहा नागदेवे वय २३, नंदिनी नागदेवे वय २०, दामिनी नागदेवे वय १८, रविता नगदेवे वय २६ हे सर्व जखमी झालेल्यांचे नावे असून, पिंडकेपार / गो. येथील रहिवासी आहेत.

सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्याचा हंगाम जोरात सुरू असून, पोटाची खळगी भरण्यासाठी भर रात्री जीवाची पर्वा न करता जंगल शिवारामध्ये जात असतात. याच गाव क्षेत्रातील खोळाया तलाव परिसर जंगलात सदर एकाच परिवारातील अवघ कुटुंब असून ज्यास्तीत ज्यास्त संकलन करण्याची लगबग सुरू असतानाच, अचानक मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे

Share