महावीर राईस मिलमधे ३३ हजाराची चोरी घटना सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड
देवरी ◼️ देवरी तालुक्यात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून महावीर राईस मिल मधे चोरी झाल्याची घटना उघड झाली. ही घटना चक्क सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड झाली. दिनांक ०६/०४/२०२४ चे ००/०० वा. ते ०२/०० वा. दरम्यान यातील फिर्यादी श्रेय नरेन्द्र कुमार जैन वय ३५ वर्ष रा. वार्ड क. ०१ देवरी ता. देवरी जि. गोंदिया चे श्री महावीर राईस मिल आमगाव रोड देवरी येथे रात्रीचा सुना मौका पाहुन कोणीतरी अज्ञात चोराने राईस मिलचे ऑफिसची खिडकी तोडुन आत प्रवेश करून टेबलचे ड्रावर तोडुन त्यात ठेवलेले नगदी ३३५००/- रूपये चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप क. १०५/२०२४ कलम ४५७,३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. ग्यानिराम करंजेकर/११५४ पो.स्टे. देवरी, हे करीत आहेत.