ब्लॉसम स्कूल देवरी येथे ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर कार्यशाळा

देवरी : ब्लॉसम स्कूल देवरी येथे प्राचार्य डॉ.सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक गीता मुळे, प्राचार्य डॉ.सुजित टेटे, शिक्षक नामदेव अंबाडे, नितेश लाडे, विश्वप्रीत निकोडे, नलू टेंभरे, संगीता काळे उपस्थित होते.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच बद्दल जागरुकता असायला हवी आणि अनावश्यक घटना घडण्यापासून थांबवायला हवं. यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक गीता मुळे यांनी अतिशय सुंदर उदाहरणे देऊन ही संकल्पना मुलांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली मोहुर्ले यांनी केले तर आभार योगिता मेश्राम यांनी मानले. यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share