‘किलबिल पाखरांची’ कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर

⬛️जि.प.प्राथ.शाळा देवरी यांचे स्तुत्य उपक्रम

देवरी ⬛️ जि..प्राथ.शाळा देवरीतील चिमुकल्यांकडूनकिलबिल पाखरांचीकार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर करण्यात आले.
26 जानेवारी 2024 ला 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा देवरी येथे विद्यार्थ्यांच्या कला अभिव्यक्तीसाठी ‘किलबिल पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध लोकनाट्य, लावणी,कोळीनृत्य,शेतकरी नृत्य,आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, बालगीतावरील नृत्य, नाटिका असे विविधांगी कार्यक्रम सादर केले.

प्रस्तुत कार्यक्रम उद्घाटक जीवन आकरे
(केंद्रप्रमुख देवरी), राजेश रामटेके , कैनाताई कोरेटी ,
विशेष अतिथी गभने सर (से. नि. शि.) सौ. डाबरे (मु.अ.भरेगाव)
.मुकेशजी वाघमारे , आरती वासमवार , सूषमा पेटकुले, कुंदा वसाके , सुनीता ऊके यांच्या तसेच शेकडो पालक, विद्यार्थीमित्र तसेच रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थित पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी प्रत्येक शाळेत अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज कार्यक्रमाचे उद्घाटक आकरे यांनी व्यक्त केले.तसेच ही शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.
अतिशय अल्प कालावधीमध्ये सुंदर व आकर्षक कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण केल्याबद्दल मंचावरील सर्व अतिथींनी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता लांडेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.टेंभुर्णे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका लांडेकर यांनी केले. मंचाचे आभार वैशाली शिवणकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रिता वंजारी यांनी केले.

Share