खासदार आमदारात रंगला नमो चषक, देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचे थाटात शुभारंभ
देवरी⬛️ नमो चषक2024 क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रिडा संकुल देवरी येथे पार पडले. संपुर्ण देशात नमो चषक चा उमंग असताना देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले असून माजी आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष संजू उइके, झामसिंग येरणे, प्रविण दहिकर, यादोभाऊ पंचमवार, बंटी भाटिया, देवकी मरई, कल्पना वालोदे , तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन पार पडला.
क्रिकेट आणि कब्बडी चे मोह खासदार अशोक नेते आणि माजी आमदार संजय पुराम यांना आवरता आला नसून चक्क खासदार साहेबांनी क्रिकेटचे फटके मारीत नमो चषकात भाग घेतला. यावेळी आमदार खासदार यांच्यात कब्बडीचा सामना रंगला होता.
तालुक्यातील कबड्डी ,क्रिकेट, बैडमिंटन , ५किमी.रनिंग स्पर्धा, महिला-३किमी.रनिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळीस्पर्धा इत्यादी खेळप्रकारचा समावेश असून , बक्षीस मोठ्या स्वरूपात असणार आहे क्रीडा प्रेमीकरिता अत्यंत आनंदाची बातमी की नमो चषक या क्रीडा स्पर्धेमधे मोफत प्रवेश,(सहभाग)घेता येईल व अनेक मोठमोठे बक्षीस पटकावता येणार तसेच प्रमाणपत्र ,शिल्ड असे स्पर्धेत सहभागीना सन्मानित केले जाईल अशी माहिती तालुकाअद्यक्ष नितेश वालोदे संयोजक नमो चषक २०२४ , इंदरजीत सिंग भाटिया सहसंयोजक नमो चषक २०२४ देवरी तालुका , सोनू चोपकर यांनी संयुक्त रित्या दिली आहे. ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले नसेल त्यानी namochasak.in ह्या वेबसाईड. ला ओपन करून फॉर्म भरून घ्यावे व नमोऍप डाउनलोड करावे ही सुद्धा. सूचना स्पर्धकाना करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धक, क्रीडा प्रेमीना व तालुक्यांतील नागरिकांना , जास्तीतजास्त संख्यामध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन तालुका युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.