राममय झाली देवनगरी, जय श्रीराम जयघोषाने देवरी दुमदुमले

देवरी: पाचशे वर्षाचा संघर्ष आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत. लाखो कारसेवकांच्या बलिदानाने भगवान रामाचे विश्‍वप्रसिद्ध मंदिरर्निर्माण होत आहे. या औचित्याने देवरी येथे रामभक्तांनी शोभायात्रा काढली यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने देवरी नगरी दुमदुमले होते.

स्थानिक प्रमुख रामभक्तांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शोभयात्रेच्या आयोजन करण्यात आले होते. रामानामाच्या गजरात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. सजविलेल्या गाडीवर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांनी हातात श्रीरामाचे भगवे ध्वज, अयोध्या राममंदिराचे छायाचित्र, माहितीपत्रक घेऊन राममंदिराचे निमंत्रण घरोघरी जाऊन दिले.

यावेळी देवरी येथील धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरातील सर्व रामभक्त महिला , पुरुष , बालगोपाल उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें