देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सव
देवरी ⬛️ येथे येत्या 24 जानेवारी पासून नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन क्रिडा संकुल देवरी येथे पार पडणार आहे. संपुर्ण देशात नमो चषक चा उमंग असताना देवरी येथे नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार असून
माजी आमदार संजय पुराम , वीरेंद्र अंजनकर गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख, तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन १२ वाजता पार पडणार आहे.
तालुक्यातील कबड्डी ,क्रिकेट, बैडमिंटन , ५किमी.रनिंग स्पर्धा, महिला-३किमी.रनिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळीस्पर्धा इत्यादी खेळप्रकारचा समावेश असून , बक्षीस मोठ्या स्वरूपात असणार आहे क्रीडा प्रेमीकरिता अत्यंत आनंदाची बातमी की नमो चषक या क्रीडा स्पर्धेमधे मोफत प्रवेश,(सहभाग)घेता येईल व अनेक मोठमोठे बक्षीस पटकावता येणार तसेच प्रमाणपत्र ,शिल्ड असे स्पर्धेत सहभागीना सन्मानित केले जाईल अशी माहिती तालुकाअद्यक्ष नितेश वालोदे संयोजक नमो चषक २०२४ , सहसंयोजक नमो चषक २०२४ देवरी तालुका ह्यानी संयुक्त रित्या दिली आहे. ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले नसेल त्यानी namochasak.in ह्या वेबसाईड. ला ओपन करून फॉर्म भरून घ्यावे व नमोऍप डाउनलोड करावे ही सुद्धा. सूचना स्पर्धकाना करण्यात आली आहे.
क्रीडा स्पर्धक, क्रीडा प्रेमीना व तालुक्यांतील नागरिकांना , जास्तीतजास्त संख्यामध्ये या महोत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन तालुका युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.