रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेगाड्या
गोंदिया: 22 जानेवारीला अयोध्येत हिंदू धर्मियांचा आनंद सोहळा साजरा करण्यात आहे. यानिमित्त श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गोंदिया रेल्वेस्थानकावरुन अयोध्येकरिता विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून 31 जानेवारी व 25 फेबु्रवारीला अयोध्येकरिता विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य विनोद चांदवानी यांनी दिली.
समस्त हिंदू धर्मियाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे. याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. अनेक बांधव अयोध्येला तयारीत आहेत. जिल्ह्यातील रामभक्त प्राणप्रतिष्ठा व श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. यासाठी गोंदिया रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाली असून त्यानुसार बिलासपूर-गोंदिया-इटारसी मार्गे अयोध्या अशी ही गाडी 31 जानेवारी व 25 फेब्रुवारीला सोडण्यात येणार असून आता औपचारीक घोषणा बाकी असल्याची माहिती विनोद चांदवानी दिली आहे.