लोककल्याण बहुउद्देशिय संस्थेतर्फे क्रिकेट स्पर्धा व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

■ भिमा कोरेगावं शौर्य दिनानिमित्य देवरी येथे जि.प.क्रिडा संकुलाच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन

देवरी: लोककल्याण बहुउद्देशिय संस्था देवरीच्या तर्फे भिमा कोरेगावं शौर्य दिनानिमित्य सात दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन रविवार पासून देवरी येथील जिल्हा परिषद क्रिडा संकुलनाच्या पटांगणावर करण्यात आले होते.
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय पुराम, जि.प.चे गटनेते संदीप भाटिया व माजी नगरसेवक यादोराव पंचमवार यांच्या हस्ते आणि या क्षेत्राचे विद्यमान आमदार कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी दिपप्रज्वलन देवरीचे उपसभापती व देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी “उगवली पहाट निळ्या पाखरांची” या समाज प्रबोधनाचे व आक्रेस्ट्रा या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.च्या सभापती सविताई पुराम व जि.प.सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते आणि येथील सेवानिवृत्त प्राचार्य के.सी. शहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी आयोजन संस्थेचे अध्यक्ष तिलकचंद शहारे,सचिव मधुकर साखरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सात दिवसीय या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजयी स्पर्धकांना प्रथम पुरस्कार एक लक्ष रूपयाचे धनादेश व शिल्ड देवरीच्या लायन्स क्रिकेट क्लब यांना तर द्वितीय पुरस्कार पन्नास हजार रूपयाचे धनादेश व शिल्ड हा सालेकसा येथील ईलाइट क्रिकेट क्लबला युवक कांग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिपक (राजा) कोरोटे यांच्या हस्ते आणि देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे देवरी तालुक्यातील क्रिकेट प्रेमी दर्शकांनी मनसोक्तपणे आनंद लुटले. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता मधुकर साखरे, सी.बी.कोटांगले, रूपचंद जांभुळकर, अमित तरजुले, मनोज नंदेश्वर, राजेन्द्र वैद्ये व अफजल पठान आदींनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share