अंगणवाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

गोंदिया : जिल्ह्यातील आंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मानधनात वाढ व इतर मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आज 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदवित आंदोलकांनी काळा दिवस पाळला. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन लागू करा, कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, ग्रेच्युटी लागू करावी, मदतनिसांना पदोन्नती द्यावी, मिनी आंगणवाडीला आंगणवाडी दर्जा द्यावा, आदी मागण्यांसाठी 4 डिंसेबरपासुन आंदोलन पुकारले आहे.

जिल्ह्यातील सर्वच आंगणवाडी सेविका, मदतणीस आंदोलनात सहभागी झाल्याने आंगणवाडींची कामे ठप्प आहेत. मात्र शासनाने अद्यापही सकारात्मक भूमिका घेतली नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील आंगणवाडी कर्मचार्‍यांनी आज जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. शासनाने आंगणवाडी सेविका, सहायिकांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले असले तरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Share