ब्लॉसम शाळेत शैक्षणिक साहित्यांची प्रदर्शनी संपन्न

◼️प्रा. डॉ. रोशन नासरे आणि प्रा. डॉ. विवेक बहेकार यांची प्रमुख उपस्थिती

देवरी 09: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल निरनिराळे सहशालेय उपक्रम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विषयांतर्गत उपक्रमाच्या माध्यमातुन आनंददायी अध्यापन पद्धतीचा वापर करुन शिक्षण देत असते. शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात ब्लॉसम महोत्सवाला सुरुवात झाली असून यामध्ये विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी, हिंदी, सामाजिक शास्त्र आणि कला विषयाच्या नानाविविध शैक्षणीक साहित्याची जत्रा भरविण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रोशन नासरे आणि प्रा. डॉ. विवेक बहेकार , मनोहर भाई पटेल महाविद्यालय देवरी प्रामुख्याने उपस्थित होते.

आनंददायी शिक्षण आणि शैक्षणिक साहित्याच्या आधारे सोप्या पद्धतीच्या सहाय्यने दृकश्राव्य साहित्याच्या मदतीने अध्ययन अध्यापन प्रभावी करण्यात येते, तसेच इंग्रजी व्याकरणाला सुलभ करून कसा शिकविता येणार यावर चर्चा करून सदर शैक्षणिक साहित्याच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान शैक्षणिक साहित्यांचे निरीक्षण आणि गुणदान प्रा. डॉ. रोशन नासरे आणि प्रा. डॉ. विवेक बहेकार यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना ब्लॉसम महोत्सव २०२४ च्या बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर शैक्षणिक जत्रेला मृतरूप देण्यासाठी प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात नामदेव अंबादे , विश्वप्रित निकोडे, चंद्रकांत बागडे, रविना मुनेश्वर, तेजस्विनी नंदेश्वर, भोजराज तुरकर आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share