तलाठी भरतीत प्रलोभनाला जनतेनी बळी पडू नये: जिल्हाधिकारी गोतमारे

गोंदिया ◼️जिल्ह्यातील 60 तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. अद्याप निवड यादी लागलेली नाही. भरतीसाठी काही दलाल सक्रिय झाल्याची चर्चा आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गोतमारे यांनी केले आहे. महाराष्ट्र महसूल विभागाच्यावतीने घेण्यात आलेली तलाठी भरती परीक्षा ऑगस्ट ते 14 सप्टेबर 2023 या कालावधीत पार पडली. गोंदिया जिल्हा महसूल विभागातर्गत तलाठी पदाच्या 60 जागांकरीता परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात आली. यात 9,330 परीक्षार्थी सहभागी झाले होते. आता परीक्षा दिलेले उमेदवार महाराष्ट्र तलाठी भरती 2023 च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यस्तरावरून या परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नसून निवड यादीही प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे कुठल्याही परीक्षार्थी उमेदवारांनी नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देणाऱ्या एजंटला बळी पडू नये, असे आवाहन गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. तसेच कुणी यांसदर्भात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देत असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share