विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यासासोबत स्वतःमधील कौशल्य विकसित करा- प्रा.राम वाघ

देवरी- सध्याच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात असो युवकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे,दिवसेंदिवस स्पर्धेच्या युगात शासकीय विभागात नौकरी मिळविण्यासाठी प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवक अभ्यासात मग्न आहे परंतु दिवसेंदिवस अभ्यास करून नैराश्यच्या भावनेत जात आहे परन्तु स्पर्धा परीक्षेचा किंवा इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना घाबरून किंवा नकारात्मक विचार करून चालणार नाही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना स्वतःमधील कौशल्य ओळखून त्याला विकसित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आकार फाऊंडेशन नागपूर चे संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्याख्याते प्रा.राम वाघ यांनी स्थानीक नगरपंचायत कार्यालय देवरी आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा संचालित सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थातच बालिका दिवस निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.पुढे त्यांनी महापुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपली ध्येयपूर्ती करत आपल्या पोटाची व्यवस्था करून सामाजिक कार्यात थोडासा खारीचा वाटा देता येईल का यावर सुद्धा आजच्या युवकांनि चिंतन कराव अस त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.यावेळी या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून नगरपंचायत देवरी च्या नगरसेविका सौ.पिंकीताई कटकवार,पोलीस उपनिरीक्षक कु.गीता मुळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार, सचिव सौ.कल्याणी लांजेवार,शिवाजी कदम,पोलिस कॉन्स्टटेबल नागदेवे उपस्थित होते.दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.दरम्यान विशेष अतिथी म्हणून उपस्थित पोलीस उपनिरीक्षक कु.मुळे यांनी आपल्या जीवनातील शालेय शिक्षणापासून ते स्पर्धा परीक्षेच्या यशापर्यंतच्या प्रवासाचा अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांसमोर उलगडा करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याचा अभ्यासमंत्र आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,संचालन हर्षवर्धन मेश्राम तर आभार मंगला गुरुमार्गी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश राठी यांच्यासह अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी आणि संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share