एक पाऊल लोकतांत्रिक स्वातंत्र्याकडे.!
नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथच्या अधिवेशनात युवकांनी घेतली प्रेरणा

गोंदिया- नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ द्वारा आयोजित 16 वा राष्ट्रीय अधिवेशन गोंदिया येथील संथागार येथे पार पडलं यात महाराष्ट्रातून चं नव्हे तर सम्पूर्ण भारतातून 18 राज्यातील 200 युवा अधिवेशनाला आले होते.
अधिवेशनाच विषय लोकत्रांतांत्रिक स्वातंत्र असे होते यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळालं कि आपण गुलाम आहोत की स्वतंत्र ज्यामध्ये स्त्रियांवर होणारे दिवसेंदिवस अत्याचार,युवकांच्या वाढत्या समस्या, या युवा अधिवेशनात स्वतः मधल्या अंधाराला आणि अज्ञानाला ओळखून उजेडाकडे म्हणजे ज्ञानाकडे स्वतःला कस घेऊन जाता येईल त्यामध्ये शिक्षण आपल्याला कशी मदत करू शकते आणि शिक्षणाच्या आधारावर आपण किती उंच झेप घेऊ शकतो,स्वतंत्रता समता बंधुता आणि न्याय या चार महत्त्वाच्या जीवन बीजांना सांभाळणे त्यांची सुरक्षा करणे आणि त्यांचा विकास कस केलं पाहिजे त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. मैत्री आणि बंधूत्व निर्माण करणे या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना सतत पाच दिवस ध्यान, वक्तव्य ,ग्रुप डिस्कशन, पॅनल डिस्कशन फ्लोटिंग सेशन, सामाजिक आणि स्वतःभिषेक जागरूकता आणि सुरक्षा, करियर विषयक संधी कला आणि संस्कृती अशा अनेक विषयांवर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले आणि विशेष म्हनजे वेगवेगळ्या भाषेचे आदानप्रदान व वेगवेगळ्या राज्यातील समस्या जाणून घेतल्या.
महत्त्वाचे म्हणजे यामध्ये, डॉ प्रशांत नारनवरे सर (स्त्री व बाल विकास आयुक्त पुणे), डॉ सिद्धार्थ गायकवाड डेप्युटी आयुक्त सामाजिक कल्याण नागपूर विभाग अमोल रंगारी, सायबर सुरक्षा मार्गदर्शक यांनी युवकांना आपलं महत्त्वाचा वेळ देऊन महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि सांगितले की असे अधिवेशन आजच्या काळाची गरज आहे आणि हे अधिवेशन नियमित रूपाने घेणे आवश्यक आहे. यामध्ये मोलाचा वाटा नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ चं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share