शहिदांच्या बलिदानापासून प्रेरणा घ्या : आ.विनोद अग्रवाल

◼️श्रध्दांजली कार्यक्रम प्रबोधन मेळावा थाटात
गोंदिया : २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपले हक्क व अधिकाराच्या न्याय मागणीसाठी लढा देताना ११४ गोवारी बांधव शहिद झाले. त्यांच्या स्मृतित आदिवासी गोवारी शहिद स्मारक तयार करण्यात आले. हे स्मारक समाजाच्या लढ्याला प्रेरणा देण्याचे काम करणार आहे. यामुळे गोवारी समाजाच्या सर्व संघटनांनी वज्रमुठ करून न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प घ्यावा, हीच शहिदांना खरी श्रध्दांजली ठरेल. यासाठी स्मारकापासून प्रेरणा घेऊन गोवारी समाज बांधवानी समाजाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी केले.
स्थानिक गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथे ३० डिसेंबर रोजी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने शहिद गोवारी स्मारक लोकार्पण, श्रध्दांजली कार्यक्रम व प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ.विनोद अग्रवाल बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदि.गोवारी समाज संघटनेचे राज्याध्यक्ष कैलाश राऊत होते. तर उद्घाटन आ.विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला रूपेश चामलाटे, भगवान भोंडे, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे शहर अध्यक्ष सुशिल राऊत, डेडूजी राऊत, चाबी संघटनेचे युवा नेता रोहित अग्रवाल, माजी नगरसेवक विष्णु नागरीकर, विनोद पंधरे, अनिल शरणागत, कुंदाताई पंचबुध्दे, रेखलाल राऊत, शेखर शहारे, हेमराज नेवारे, के.के.नेवारे, भुनेश्वर ठाकरे, शिवलाल नेवारे, जगदिश शेंद्रे, ओमप्रकाश शहारे, रिपाई (आठवले) जिल्हाध्यक्ष भाऊ गजभिये, कृष्ण फुन्ने, प्रकाश फुन्ने, रामप्रसाद गुजर, अरविंद राऊत, संजय राऊत, प्रेमलाल शहारे, धृव चचाणो, श्रीचंद चौधरी, प्रकाश चौधरी, खेमलाल वाघाडे, बळीराम राऊत, राजकुमार राऊत, अनिल राऊत, दिनेश कवरे, राजु वाघाडे, शशिकांत कोहळे, गुलाब नेवारे, अनिताताई नेवारे, माहेश्वरी नेवारे, आशा नेवारे, श्रीमती डिम्पल उके, तिर्थराज ऊके, भिमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे, संतोष पटले, गोकुल बोपचे, सुरेश नेवारे, सुनिल भोयर, अरूण काळसर्पे, गोंविद वाघाडे, डॉ.शारदाताई राऊत, वसंत नेवारे, सुनिल सोनवाने, संतोष शहारे, मारोती नेवारे, अक्षय नेवारे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिसुर्य बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर आ.विनोद अग्रवाल व समाजातील मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करुन ११४ आदिवासी गोवारी शहिद बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पुढे बोलताना आ.विनोद अग्रवाल यांनी शक्तीशाली लोकांचा दबाब व मतांच्या राजकारणाने गोवारी आरक्षणाच्या लढ्यात अडथळा निर्माण होत आहे. पण गोवारी बांधवांनी हतबल होऊ नये, कारण सत्य विचलित होऊ शकते पण पराजित होत नाही. एक ना एक दिवस सत्याचा विजय होणार आहे. वैभवशाली समाज निर्मितीसाठी गरीब व गरजूंना न्याय मिळालाच पाहिजे, गोवारी समाजाचा लढा निश्चितच यशस्वी होणार, आपण समाजाच्या लढ्यात गोवाारी बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून जी मदत लागेल ते करणार, अशीही ग्वाही आ.विनोद अग्रवाल यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जगदिश शेंदरे यांनी समाजाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. संचालन रेखलाल राऊत तर उपस्थितांचे आभार शहर अध्यक्ष सुशिल राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोवारी स्मारक समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
……………………….
जात कमिट्यांमुळेच आदिवासी सवलतीपासून समाज वंचित : कैलाश राऊत
गोवारी समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळावे, यासाठी समाजाचा लढा मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही गोवारी समाजाला आदिवासीच्या सवलती देण्यास शासन, प्रशासन दिरंगाई करीत आहे. सर्वोच्च न्याायालयाने ऑब्जरर्वेशन केले, उच्च न्यायालयाने समाजाच्या बाजुने निकाल दिला. पण राज्य शासनाचा आदिवासी विकास मंत्रालय आणि नियुक्त करण्यात आलेल्या जात समित्या गोवारी हक्क नाकारत आहेत. यामुळे आता हक्क व अधिकारासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. यामुळे समाजाने एकसंघ होऊन शासनाचे कटकारस्थान हाणून पाडावे, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे अध्यक्ष कैलाश राऊत यांनी केले.
…………………….
.विनोद अग्रवाल यांना निवेदन
आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने आयोजित प्रबोधन मेळावा व श्रध्दांजली कार्यक्रम आ.विनोद अग्रवाल यांना समाज संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढणार, असे आश्वासन दिले.
……………….
आदिवासी संस्कृतीचे दर्शन
प्रबोधन मेळावा व आदिवासी शहिद स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गोवारी समाजातील युवक-युवतींनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. पारंपरिक वेशभुषा साकारुन आदिवासी नृत्य सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
००००००

Share