इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या सेवेत

गोंदिया : बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा येत्या 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरु होत आहे. यासाठी इंडिगोचे विमान लवकरच जिल्ह्यावासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. यापुर्वी 13 मार्च 2022 पासून या विमानतळावरून इंदूर-गोंदिया-हैदराबाद प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली होती. मात्र अवघ्या सहा महिन्यातच ही सेवा बंंद पडली. तेव्हापासून या विमानतळावरुन पुुन्हा प्रवासी सेवा सुुरु करण्याकरीता प्रयत्न सुरु होते.

अखेर माजी केंंद्रीय विमान वाहतूक मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने येत्या 1 डिसेंंबरपासून इंडिगो एअरलाईन्स गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी वाहतूक करण्यास सज्ज झाली आहे. इंडिगोच्या वतीने तिरुपती-हैद्राबाद-गोंदिया या मार्गाची घोषणा करण्यात आली असून गोंदियावरुन व्हाया हैद्राबाद मार्गे पुणे व मुंबई सेवा सुध्दा 1 डिसेबंरपासूनच सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यादृष्टीने वेळापत्रक सुध्दा तयार करण्यात आले आहे.

यासंदर्भात इंडिगो कपंनीने विमानतळाची पाहणी केली असून कंपनीने 17 नोव्हेंबरला नॉनशेड्युल प्रायोगिक तत्वावर हैद्राबाद ते गोंदिया असा प्रवास 72 आसनी विमानाने करुन विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक पूर्ण केले आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे विमान 1 डिसेबंरला मुंबई, पुणे, हैद्राबाद मार्गे उड्डाण करणार हे निश्‍चित झाले आहे.

Share