पर्यटकांची पितांबरटोला प्रवेशद्वाराला पसंती

राष्ट्रीय महामार्ग -6 वरील देवरी पितांबरटोला प्रवेशद्वार ठरले आकर्षण

देवरी ◼️ गोंदियाजिल्ह्यातील नवेगाव, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पितांबरटोला प्रवेशद्वाराला पर्यटकाची पसंती मिळत आहे. या प्रवेशद्वाराने जंगल सफारी केल्यास बिबट्याचे हमदास दर्शन व वनराईचे मोहक निसर्गसौंदर्याचा आनंद मिळत असल्याचा पर्यटकांचा अनुभव आहे. नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात 9 प्रवेशद्वार आहेत. व्याघ्र प्रकल्पाचे 70 टक्के क्षेत्र गोंदिया जिल्ह्यात व 30 टक्के क्षेत्र भंडारा जिल्ह्यात येते. त्यापैकी एक म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग -6 वरील देवरी जवळील पितांबरटोला प्रवेशद्वार आहे.

या प्रवेशद्वार परिसरातील जंगलात आजघडीला जवळपास 8 बिबट, 12 अस्वल, 35 च्या संख्येत रानगवे असल्याची माहिती असून जंगल सफारी करताना अन्य वन्यप्राण्यांसह बिबट्याचे हमखास दर्शन होत असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रवेशद्वाराने व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला पर्यटकांची मागील काही वर्षात पसंती मिळत आहे. 2013-14 पासून हे प्रवेशद्वार सुरु करण्यात आले असून स्थानिक युवक गाईड म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. या प्रवेशद्वारामुळे रोजगार उपलब्ध झाल्याने गावातील नागरिक इको टुरिझमला महत्व देत क्षेत्रातील निसर्ग सौंदर्यासह प्रवेशद्वाराचे मोहक सौंदर्यीकरण पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने येणारे पर्यटकासाठी पितांबरटोला प्रवेशद्वार जंगल सफारीचे केंद्र ठरत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share