क्लासमेट्स इन्फोटेक द्वारे विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरीटीचे धडे
देवरी ◼️ तालुक्यातील लोहारा येथील क्लासमेट्स इन्फोटेक एंड कम्प्युटर द्वारे साईबर सेक्युरिटी व नवीन तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना कोणकोणते स्कील कोर्सेस शिकायला पाहिजे या विषयावर MKCL च्या अनुभवी मार्गदर्शकडून मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण आणि तंत्रज्ञानाची माहिती असावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात MKCL चे संदेश पथये , अक्षय चौव्हाण क्लासमेट्स इन्फोटेक चे संचालक रंजित टेटे व तंत्रशिक्षक देविदास टेटे उपस्थित होते. त्यात संदेश पथये यांनी आपल्या मोबाईल व कम्प्युटर वर कसे व कोणत्या प्रकारे कोणी हल्ला करू शकतो. त्यावर कशाप्रकारे उपाय करता येईल किंवा आपल्याला काय काय दक्षता घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनतर केंद्राचे संचालक यांनी आजच्या यंत्र युगात कोणते स्कील आपल्यात असणे आणि ते उपयोगात कसे आणायचे या बद्दल मार्गदशन केले. विध्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्कील कोर्सेस कडे वळावे हे आवाहन केले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते.