ओरीजनल आधारकार्ड असेल तरच बसमध्ये मोफत प्रवास

डुप्लिकेट आधार कार्ड किंवा झेरॉक्स दाखवून प्रवास करता येणार नाही

गोंदिया ◼️ एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीर पत्नी, ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला, मुली, विद्यार्थी, विद्यार्थीनी, खेळाडू, दिव्यांग आदींना प्रवास भाड्यात वेगवेगळी सवलत दिली जाते. मात्र, एसटी प्रवासात सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर ओरिजनल आधारकार्ड सोगत ठेवावे लागणार आहे.

अनेकांनी वय वाढवून डुप्लिकेट आधार कार्ड केलयाचे उघड झाले आहे. त्यामुळे आता प्रवास भाड्यात सवलत हवी असेल तर ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित प्रवाशांना प्रवास भाड्याच्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही. प्रवास भाड्याची पूर्ण रक्कम वाहकाला द्यावी लागणार आहे.

एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून एसटी महामंडळाने ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तिंना एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागते.

महिलांना व जेष्ठांना अर्धे तिकीट

यावर्षी सुरु करण्यात आलेली महिलांना एसटी बसच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सुट योजना कमालीची लोकप्रिय झाली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन फिरणाऱ्या राजय परिवहन महामंडळातर्फे एसटी बसमध्ये जेष्ठ नागरिकांना तिकीटात ५० टक्के सुट आहे. अर्थात अर्ध्या तिकीटातमध्ये जेष्ठ नागरिक प्रवास करू शकतात.

योजनेचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून मूळ आधार कार्ड बघितले जाते, असे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. रामपच्या या धोरधामुळे मूळ आधारकार्ड महत्वाचे ठरणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share