सलून व्यवसाय वाढीसाठी कार्यशाळा उत्साहात
◼️कार्यशाळेत आधुनिक प्रात्यक्षिके सादर
गोंदिया – सध्या आधुनिक स्पर्धेचे युग आहे. आणि या आधुनिक स्पर्धेत टिकला तो टिकला. या सर्व बिंदूवर विचार करुन सलून व्यवसाय वाढीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाज युवा संघटना जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने दि. ३१ ऑक्टोबर मंगळवारला गोंदिया येथील भवभूती रंग मंदिरात प्रथमच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भुमेश मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय उपाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांनी केले. यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज लांजेवार, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चन्ने , गोंदिया तालुकाध्यक्ष हेमंत कौशल, शहर अध्यक्ष दिनेश फुलबांधे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक म्हणून नागपूर येथील बादल सर आणि आमगांव येथील प्रवीण तैकर हे होते. प्रशिक्षकांनी नाभिक समाजाचा सलून व्यवसाय वाढीसाठी नाभिक समाजातील उपस्थित असलेले एकूण १७० समाज बांधवांना आधुनिक पद्धतीचे नवनवे प्रात्यक्षिके करुन दाखवले व मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चन्ने यांनी मांडले. संचालन विवेक उरकुडे यांनी केले असून उपस्थित सर्वांचे आभार तालुका उपाध्यक्ष अजय शेंडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी नाभिक समाज संघटनेचे गोंदिया शहर अध्यक्ष दिनेश फुलबांधे व परिवार, दिलीपचंद पगाडे, हिंमत सूर्यवंशी, प्रदिप लांजेवार, नरेश कावळे, हेमंत कौशल, प्रकाश शेंडे, अंकुश सूर्यवंशी, अमोल चन्ने, राज हटेले आणि इतर युवकांनी सहकार्य करुन भविष्यात पण नाभिक समाजात एकता ठेवून नाभिक समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.